राशीन :- मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसूतिसाठी आली असता अचानक तिचा रक्तदाब वाढल्यामुळे प्रसुतीत अडचणी वाढल्या. तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा बांगर यांनी तत्काळ खासगी स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. दयानंद पवार यांच्याशी समन्वय साधत सिझेरियनद्वारे प्रसुती पार पाडली.

मंदा बबन घालमे (रवळगाव) असे या महिलेचे नाव आहे. डॉ. सुवर्णा बांगर, भूलतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण पवार यांच्यासह परिचारिका मनीषा पिसाळ, रत्नमाला पालवे, ज्योती ढगाळे, कक्षसेवक विजय धस यांनीही मोलाचे सहकार्य केले.
- पुढील 15 दिवस कसा राहणार सोयाबीनचा बाजार ? दिवाळीत आणि दिवाळीनंतर पिवळं सोन शेतकऱ्यांना तारणार की मारणार
- दिवाळीत ‘या’ पाच स्टॉक मध्ये गुंतवणूक करा, पुढील दिवाळीत मिळणार 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न !
- दिवाळीत कार खरेदी करणे झाले सोपे ! ‘या’ 5 बँकांकडून मिळणार सर्वात स्वस्त कार लोन
- महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढल्यानंतर शिपाई, लिपिक, सेक्शन ऑफिसर कोणाचा पगार किती वाढणार?
- दिवाळीनिमित्त होंडाने आणली खास ऑफर! ‘या’ Car वर मिळणार 1.51 लाख रुपयांचा डिस्काउंट