पिंपरी : उत्तर प्रदेशातून विमानाने येऊन तसेच आलिशान हॉटेलमध्ये राहून उच्चभ्रू फ्लॅटची रेकी करीत त्यातील लाखोंचा ऐवज लांबवणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी अटक केली.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे वाकड पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्याच्याकडून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अनिल मिश्री राजमर (३६, रा. बोदरी, जि. जोनपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
असा करायचा चोरी
सराईत राजमर हा उत्तर प्रदेशमधून विमानाने पुण्यात येत असे. त्यानंतर एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक करत असे. हॉटेलमध्ये तीन ते चार दिवस राहून शहरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये कोणाला संशय येणार नाही, अशा वेशात रेकी करीत असे.
रोज दुपारी बंद असणारा एखादा आलिशान फ्लॅट हेरून दिवसा घरफोडी करत असे. त्यानंतर सोन्याची शहरात विल्हेवाट लावून पैसे घेऊन पुन्हा विमानाने जात असे.
- 8 वा वेतन आयोग : सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना मोठा दिलासा; वेतन, पेन्शन आणि एरियरमध्ये वाढ
- आधार कार्डमध्ये पतीचे नाव कसे जोडावे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क
- निवृत्तीनंतर हमखास उत्पन्नाचा मजबूत आधार! LIC स्मार्ट पेन्शन योजनेतून दरमहा 10,880 पेन्शन कशी मिळते?
- नवपंचम राजयोगाचा प्रभाव: १७ फेब्रुवारीपासून काही राशींच्या नशिबात मोठे बदल, प्रगती आणि समृद्धीचे संकेत
- कमाईची संधी ! तज्ज्ञांनी सुचवलेले 3 मजबूत शेअर्स; जाणून घ्या सविस्तर













