नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सुमारे १.७६ लाख कोटींचा संचित निधी व लाभांश घेण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘आरबीआयवर डल्ला मारल्याने आता काहीच होणार नाही. पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या स्वत:च्या चुकांमुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे

रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपयांचा लाभांश व संचित निधी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्यावरून माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा केंद्राशी वाद झाला होता. तथा ऊर्जित पटेल यांनीही आपल्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही आरबीआयने हा निधी सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे.
आपल्या चुकांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर कसे पडावे हेच पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना ठाऊक नाही. आता रिझर्व्ह बँकेत चोरी केल्याने काहीच होणार नाही. हा एखाद्या दवाखान्यातून बँड-एड चोरून गोळी लागून झालेल्या जखमेवर लावण्यासारखा प्रकार आहे’, असे राहुल यांनी मंगळवारी एका ट्विटद्वारे म्हटले आहे.
- लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा; तीन महिन्यांचा हप्ता एकत्र, थेट ४५०० रुपये मिळणार
- पीएम किसान योजनेत वाढ नाही, शेतकऱ्यांची नाराजी कायम
- Samsung Galaxy S26 सीरिज लवकरच लाँच होणार? AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसरचे लीक तपशील समोर
- आयआयटी बॉम्बेचा ‘जीवोदय’ प्रकल्प : रेशीम उत्पादनात मानवी आणि पर्यावरणपूरक क्रांती
- माळशेजपेक्षाही सुंदर! ‘महाराष्ट्राचे मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे तापोळा पर्यटकांचे नवे आकर्षण













