अकोले : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी क ाँग्रेसच्या विजयी आमदारांत अकोले तालुक्याचे पहिले नाव असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला.
मंगळवारी दुपारी अकोले शहरात जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यावेळी फाळके बोलत होते. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, बबन तिकांडे, मदन पथवे, महेश तिकांडे, पोपट दराडे, कोंडाजी ढोन्नर, रामनाथ सहाणे, बाळासाहेब आवारी, प्रा. चंद्रकांत नवले, भाऊसाहेब साळवे, अमित नाईकवाडी, मनसेचे संजय वाकचौरे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फाळके म्हणाले, विरोधी पक्षात असतानाच पक्ष संघटनेसाठी चांगले काम करता येते. येत्या दोन दिवसात अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली जाईल. अकोले विधानसभेचा उमेदवार हा शरद पवार यांच्या विचारांचा असेल,अशी ग्वाही देवून आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याला धमकी, खोटे गुन्हे, केस दाखल करण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हाध्यक्ष म्हणून आपण त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहू.
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ज्यांना जायचे होते ते गेले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले की, ज्यांना पक्षात अढळ स्थान होते. सर्व मानसन्मान असताना ते पक्षाला सोडून गेले. त्यांनी शरद पवार यांना या वयात जे दु:ख दिले त्याची दखल अकोले तालुक्यातील सूज्ञ जनता व मतदार निश्चित घेईल.
तालुका फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा आहे.यावेळी डॉ. किरण लहामटे, बबन तिकांडे, विनोद हांडे, बाळासाहेब आवारी आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक भाऊसाहेब साळवे, स्वागत संपत नाईकवाडी यांनी तसेच सूत्रसंचालन संदीप शेणकर यांनी केले.
- शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता
- सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबान ! ‘या’ प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण
- एसबीआय, एचडीएफसीसह सर्वच खाजगी आणि सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 नोव्हेंबर 2025 पासून ‘हा’ नियम बदलणार
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी Good News ! ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मिळणार डबल बोनस
- पोस्टाची ‘ही’ योजना बनवणार लखपती ! 5 वर्षात मिळणार 5 लाखांचे व्याज, कोणाला करता येणार गुंतवणूक?













