श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी रात्री आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला.

सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.या बातमीने राजकीय वर्तुळासह काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.

कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. कांबळे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक होते. पण त्यांनी थोरात यांची साथ धरली होती. आज त्यांनी थोरात यांची साथ सोडली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप तसेच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत चालली असून आमदार कांबळे यांच्या रूपाने नगर जिल्ह्यातील आणखी एक काँग्रेस आमदार सत्ताधार्यांच्या गळाला लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील हे भाजपात गेले. व खासदार झाले.
त्यांनतर ना. विखे पाटील यांनीही काँग्रेस ला रामराम करत भाजपाचा रस्ता धरला. तेव्हापासून काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात गळती लागली आहे.
माजीमंत्री वैभव पिचड यांच्या भाजप प्रवेशा नंतर आता आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे आ.भाऊसाहेब कांबळे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान या वृत्ताबाबत आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला असून मी मतदारसंघाच्या भवितव्याचा विचार करून मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
- धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करणे योग्य ठरणार का ? तज्ज्ञांचा सल्ला काय
- FD चा नाद सोडा ! Post Office च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा अन मिळवा 4.5 लाखांचे व्याज
- ‘हे’ 5 शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करा ! 12 महिन्यात मिळणार 24 टक्क्यांचे रिटर्न
- सरकारी कर्मचाऱ्यांची दिन दिन दिवाळी ! दीपोत्सवात किती दिवस राहणार सुट्ट्या? समोर आली यादी
- ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स ! दररोज ऑफिसमध्ये जाण्यासाठी ठरतील बेस्ट