नेवासा ;- तालुक्यातील गोगलगाव-जुना मंगळापूर शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्याने हा रस्ता वहिवाटीस बंद होता. त्यामुळे या परिसरातील काही शेतकर्यांना रस्ता नसल्याने शेती कसता येत नव्हती. या संदर्भात येथील महिला शेतकर्याने महसूल प्रशासनाकडे सलग सात वर्षे पाठपुरावा केला. या त्यांच्या लढयाला यश आले असून हा रस्ता खुला झाला आहे.
हा दीड किलोमीटरचा रस्ता खुला झाल्याने या परिसरातील सुमारे 100 हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ झाल्याने तहसीलदारांचे शेतकर्यांमधून अभिनंदन होत आहे.गोगलगाव ते जुना मंगळापूर या शिवरस्त्यावर अतिक्रमण झाले होते. त्यामुळे दीड किलोमीटरचा हा रस्ता वहिवाटीस बंद झालेला होता. या परिसरातील शेतकर्यांना जमीन कसण्यात अडचणी येत होत्या.

त्यामुळे काहींच्या जमीनी केवळ रस्ता नसल्याने पडीक पडलेल्या होत्या. शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत शिवरस्ते, पानंद रस्ते खुले करून देण्याची योजना सुरु केलेली होती. या योजनेंतर्गत हा रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी येथील शेतकरी लिलावती गोविंदराव झावरे यांनी नेवासा तहसीलदारांसह जिल्हाधिकार्यांकडे केली होती.
त्यासाठी 2012पासून महसूल प्रशासनाकडे अर्ज, विनंत्या केल्या जात होत्या. मात्र या अर्जाची दखल घेण्यात प्रशासनाकडून घेतली जात होती. 2012 पासून या संदर्भात लिलावती झावरे यांनी कायम स्वरुपी महसूल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरवा केला. त्या पाठपुराव्याला अखेर यश आले.
याच प्रश्नासाठी लिलावती झावरे यांनी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यासह जिल्हाधिकार्यांकडे तक्रार अर्ज करून रस्ता खुला करा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. कर्तव्य दक्ष अधिकारी तहसीलदार सुराणा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी रस्त्याची पहाणी केली.
त्यानंतर तहसीलदार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात हा रस्ता खुला करण्यात आला. ही कारवाई मंडलाधिकारी जी. जे. भालेराव, कामगार तलाठी बी. ए. कर्जुले, आर. एस. जोशी, कोतलवाल रामभाऊ हिवाळे, बी. आर. पातारे, मोजणीदार एस. बी. लवांडे, विजय पटारे, पोलिस कॉन्स्टेबल देवा खेडकर यांच्या पथकाने केली.
हा रस्ता खुला झाल्याने गळिनंब, मंगळापूर, गोगलगाव या तीन गावातील सुमारे 250 शेतकर्यांना या रस्त्याचा फायदा झाला आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ या परिसरातील सुमारे 100 हेक्टर एकर क्षेत्रावरील शेतकर्यांना हा रस्ता जाण्यायेण्यासाठी फायद्याचा ठरला आहे.
शेतकर्यांमधून तहसीलदारांचे अभिनंदन
रस्ता खुला व्हावा, यासाठी लिलावती झावरे यांचा महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र प्रशासन दखल घेत नव्हते. परंतु या प्रश्नासंदर्भात आंदोलनाचे निवेदन तहसीलदार सुराणा यांना दिल्यानंतर त्यांनी या प्रश्न स्वतः लक्ष घालून घटनास्थळी तब्बल पाच तास उभे राहून रस्ता खुला करून दिला. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे. जे सात वर्षात नेवाशात होऊन गेलेल्या सहा तहसीलदारांना जे जमले नाही ते सुराना यांनी करून दाखवले आहे.
अशाच तहसीलदारांनी नेवाशाला खरी गरज आहे.
गोगलगाव ते जुना मंगळापुर शिव रस्ता पानंद रास्ता योजनेमध्ये बसून हा रस्ता खडीकरण व मुरमीकरण करून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे यासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्याकडे तशी मागणी केली आहे.
रस्ता खुला पन साईड गटारचे काम अडवले
रस्ता खुला झाला असला तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीचे काम या दीड किलोमीटर रस्त्यामध्ये लोकसहभागातून करण्यात येत आहे परंतु एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणामुळे हेच साईट गटाराचे काम ठप्प झालेले आहे ते काम तहसीलदारांनी लक्ष घालून करून घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…
- IFCI Share Price: IFCI शेअर्समध्ये मागच्या आठवड्यापासून तेजी! दिला 5.82% रिटर्न… आज मात्र?