श्रीरामपूर : विराेधी पक्षातील आमदारांना राजीनामा देण्याची जेवढी घाई झाली आहे, तेवढीच सत्ताधारी पक्षांनाही तेे राजीनामा मंजूर करवून घेण्याची घाई झालेली दिसते. श्रीरामपूरमधील काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी मुंबईत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चक्क विशेष चार्टर विमानाची व्यवस्था केली हाेती. कांबळे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते व विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे, जयंत ससाणे यांचे कट्टर समर्थक होते, पण नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आदिकांना साथ दिली.

लोकसभा निवडणुकीत विखेंची साथ साेडून आमदार बाळासाहेब थाेरातांना जवळ केले व शिर्डी मतदारसंघात शिवसेेनेविराेधात निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. अाता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकिटाची हमी दिल्याची माहिती आहे. शनिवारी ‘मातोश्री’वरील बैैठकीनंतर कांबळेंनी तडकाफडकी राजीनामा देण्याचे ठरले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पुण्याला होते. ते चार दिवसांकरिता बाहेर जाणार असल्याचे समजले.
त्यामुळे कांबळे यांना मुंबईतून रात्री सात वाजता पुण्याला रवाना करण्याचा निर्णय झाला. ठाकरे यांनी खासगी चार्टर विमान देत मिलिंद नार्वेकर यांना त्यांच्यासोबत पाठवले. नार्वेकर, खेवरे, सचिन बडधे हे कांबळें समवेत गेले. रात्री दहा वाजता पुणे विमानतळावरच कांबळे यांनी बागडेंकडे राजीनामा दिला.
- देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त Home Loan ! 50 लाखांच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार 40 लाखांचे रिटर्न!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर ?
- चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही !
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात