नवी दिल्ली : स्थिती चिंताजनक असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रविवारी केली. सिंग म्हणाले, सकल राष्ट्रीय उत्पादन केवळ ५% च्या दराने वाढले आहे. यातून मंदीच्या विळख्यात असल्याचा इशारा मिळतो.
भारतात वेगवान विकासाची क्षमता आहे. मात्र, मोदी सरकारच्या चहुबाजूच्या कुव्यवस्थापनामुळे मंदी आली आहे. निर्मिती क्षेत्राचा वृद्धी दर ०.६% आहे. यातून स्पष्ट होते की, अर्थव्यवस्था अद्यापही नोटबंदीचा चुकीचा निर्णय आणि घाईत लादलेल्या जीएसटीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरू शकली नाही.

विकास दर १५ वर्षांत सर्वात नीचांकी स्तरावर आहे. मनमोहन यांच्या वक्तव्यावर अर्थमंत्री सीतारमण यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उत्तर देणे टाळले. आपण औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटत अाहोत. समस्या ऐकून घेत आहोत.
उद्योग जगताला काय हवे आहे याबाबत सल्ला घेत आहोत, असे त्या म्हणाल्या. सीतारमण यांनी देशात मंदी आहे काय, सरकार मंदीच्या बातम्यांशी सहमत आहे का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले.
- iPhone 17 Pro सारखा लूक, 9000mAh बॅटरी आणि दमदार प्रोसेसर; Redmi Turbo 5 सीरीजची जोरदार एंट्री
- केंद्रीय अर्थसंकल्प 2026 कडून अपेक्षा शिगेला; करसवलत, आरोग्य, प्रवास आणि उद्योग क्षेत्रावर सरकारचा फोकस
- पीएम किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार का? अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, सध्या वर्षाला मिळतात ६,००० रुपये
- अर्थसंकल्प २०२६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा? रेल्वे तिकीट सवलत पुन्हा सुरू होण्याची शक्यता
- टीईटी परीक्षेबाबत मोठी बातमी: निवडणूक आयोगाच्या गोंधळामुळे हजारो शिक्षक उमेदवार परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता













