अहमदनगर :- आपल्या सुमधुर आवाजे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे निवेदक ,युवा व्याख्याते ,लेखक, कवी, रेडिओ जॉकी, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व ऋषिकेश शेलार यांना महाराष्ट्राचा युवा आयडॉल निवेदक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या अनोख्या आवाजाने त्यानी रसिक प्रेक्षकांना अगदी थोड्या दिवसात आपलेसे केले आणि संपूर्ण महाराष्ट्राचा साठी त्यांचे व्यक्तीमत्व एक आदर्श बनून गेले.

सर्व कठीण परिस्थितींना तोंड देत संघर्ष करुन ऋषिकेश ने परिस्थितीने हतबल न होता यशाची पायरी गाठली आणि अवघ्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला.
आज महाराष्ट्रामध्ये अनेक निवेदक असताना त्यांनाच हा पुरस्कार का मिळाला यांचे एक सुंदर उदाहरण त्यांना पुरस्कार देताना युवा ध्येय चे संपादक लहाणु सदगीर यांनी सांगितले ते म्हणाले की आवाजामध्ये लयबद्धता,
आणि बातम्या सांगण्याची आकाशवाणी पुणे केंद्राच्या निवेदकांसारखी असलेली ऋषिकेश शेलारची अनोखी स्टाईल या, सर्व गोष्टी मुळे त्यांना आम्ही हा पुरस्कार सन्मानपुर्वक देत आहोत.
आणि ऋषिकेश शेलार यांचा आवाज खरच खूप सुंदर आहे. अशा शब्दांत त्यांनी ऋषि चे कौतुक केले. हा पुरस्कार सोहळ अहमदनगर च्या माऊली सभागृहात पार पडला.
हा पुरस्कार सर्वात कमी वयात अर्थातच वयाच्या एकविसाव्या वर्षी मिळवणारा ऋषिकेश शेलार हा पहिलाच मानकरी ठरला आहे.हा पुरस्कार त्याना दैनिक युवा ध्येय कडून माजी कुलगुरू आणि गणित तज्ञ डॉक्टर प्रा.सर्जराव निमसे यांच्या हस्ते माऊली सभागृहात देण्यात आला.
ऋषिकेश शेलार यांनी बऱ्याच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या आहेत. ते पुर्वी कु-कु एफ एम चे रेडिओ जॉकी होते आणि आत्ता सध्या ते जीवन मेट्रो न्यूजचे निवेदक म्हणून कार्यरत असुन ते रयत शिक्षण संस्था दादापाटील महाविद्यालय कर्जत चे वनस्पती शास्त्र विभागाचे विद्यार्थी आहेत.
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…
- IFCI Share Price: IFCI शेअर्समध्ये मागच्या आठवड्यापासून तेजी! दिला 5.82% रिटर्न… आज मात्र?