पारनेर :- अहमदनगर जिल्ह्यात राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर १२-०घोषणा करुन त्यादृष्टीने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात बांधणी सुरु केली.
पारनेर -नगर विधासभा मतदारसंघासाठी भाजपकडून विखे कुटूबियांशी पस्तीस वर्षापासून घनिष्ठ संबध असलेले माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे पुत्र पारनेर पंचायत समिती सभापती राहुल झावरे यांना विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे विखेंनी आदेश देवून प्रवरेची यंत्रणा सक्रिय केल्याने गणपती स्थापणेच्या दिवशी तालुक्यात नव्या राजकीय समिकरणाला सुरुवात झाली.

माजी आमदार नंदकुमार झावरे यांना मानणारा मोठा कार्यकर्त्यांचा संच तालुक्यात आहे. तसेच सभापती राहुल झावरे यांनी अडीच वर्षात पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समिती लोकाभिमूख करत पारदर्शी कारभार ,दुष्काळी परिस्थितीत पाणी ,रोजगार यांचे केलेले नियोजनामुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सर्वपक्षिय कार्यकत्यांशी सभापती झावरें यांच्या असलेले घनिष्ठ संबध,युवकांचे केलेले संघटन,हजारो लाभार्थ्यांना योजनेचा झालेला लाभ तसेच नामदार राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांची राजकीय ताकद यामुळे सभापती राहुल झावरेंचे विधानसभेसाठी जमेची बाजू ठरणार आहे.
- Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?
- कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
- दिवाळीत कमाईची संधी ! ‘हे’ ३ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर पैसाच पैसा
- 365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख
- Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई