कर्जत – कर्जत-जामखेडमधील युवक-युवतींसाठी सृजन फाऊंडेशनमार्फत आयोजित केलेल्या थेट नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून कंपन्यांनी 1147 जणांच्या प्राथमिक टप्प्यात निवडी केल्या.
हा पहिलाच टप्पा असून यापुढील काळातही नोकरीसाठी शिबीरे व मेळावे घेणार असल्याचे सांगत ही अखंड प्रक्रिया सुरू राहील असे आश्वासन आयोजक रोहित पवार यांनी युवक-युवतींना दिले.

कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात झालेल्या थेट नोकरी मेळाव्यात राज्यभरातील वेगवेगळ्या 50 कंपन्या सहभागही झाल्या होत्या. तर 5 हजार 70 उमेदवार या मेळाव्यासाठी येथे आले होते.
गर्दीचा प्रतिसाद या मेळाव्यात मोठा मिळाल्याने रोहित पवार यांनी नोकरी मिळणे बाबतची संख्या मोठी असल्याने यापुढील काळातही वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्यांशी संपर्क साधून या दोन तालुक्यात ही प्रक्रिया सातत्याने राबविण्याचा निर्णय घेतला.
आज सहभागी झालेल्या कंपन्यांच्या मार्फत यापुढील काळातही कर्मचाऱ्यांची भरती या परिसरातूनच होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये कर्जत व जामखेड परिसरातील तरुण व तरुणींसाठी या ठिकाणीच करियर प्लॅनिंग शिबिरही होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
- जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाल्यानंतर गॅस सिलेंडर पण स्वस्त होणार का? समोर आली मोठी माहिती
- आठवा वेतन आयोग : 30 हजार, 50 हजार आणि 80 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ?
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ
- Vikran Share Price: ‘हा’ स्मॉल कॅप स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांका जवळ! आज छप्परफाड कमाईची संधी?
- RPOWER Share Price: बापरे! 5 वर्षात दिला 1479.33% रिटर्न… तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?