श्रीगोंदा :- ढवळगाव ते बेलवंडीफाटा रस्त्यावर खर्च केलेले ३ कोटी ८० लाख खड्ड्यात गेले आहेत. डांबरीकरणास चार महिने उलटत नाही तोच ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे की नाही अशी शंका येते.
बऱ्याच ठिकाणी दीड मीटर रुंदीच्या साईडपट्ट्या केलेल्या नाहीत. बेलवंडीफाटा ते ढवळगाव रस्ता पुढे बेलवंडी रेल्वे स्टेशन व अष्टविनायकांपैकी सिद्धटेककडे जात असल्याने रस्त्यावर सतत वाहतूक असते. परिसरात दोन सहकारी व एक खासगी साखर कारखाना आहे.

कारखाने चालू झाले की, रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. अनेक ठिकाणी तुटफूट होते. पाऊस नाही, कारखान्यांचा हंगाम सुरू नसताना रस्ता खराब झाला आहे. रस्ता खचल्यामुळे गाडी चालवताना खड्डे दिसत नाहीत. अचानक समोर खड्डा आल्यानंतर वाहकाचे नियंत्रण जाऊन अपघात होतात.
आमदार राहुल जगताप यांनी या रस्त्यासाठी निधी दिला. ठेकेदाराने कामाचा दर्जा चांगला न राखल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत. सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी अतुल लोखंडे यांनी केली.
- आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शन धारकांना मिळणार अधिक लाभ ? कस ते वाचा….
- जन्मजात नशीबवान असतात कोणत्याही महिन्याच्या ‘या’ 3 तारखांना जन्मलेले लोक ! Pm मोदी सुद्धा आहेत त्यातील एक
- ‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांवर पाडणार पैशांचा पाऊस ! मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले शेअर्स देणार जबराट परतावा
- Aadhar Card च्या ‘या’ नियमांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! आता….
- ‘या’ तारखांना जन्मलेले लोक अचानक होतात श्रीमंत ! १००% मिळवतात यश, झटपट यशस्वी होण्याचे सूत्र असते हाती













