बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’चा धडाका सुरूच आहे. चित्रपटाने १५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने १७.१० कोटी रुपये एवढा व्यवसाय केला.
‘कबीर सिंह’ची घोडदौड अगदी जोरात सुरू आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा १६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मधल्या काळात चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. तिकडे ‘अॅनाबेल कम्स होम’ या हॉलीवूडपटाने पहिल्या दिवशी ३ कोटी रुपये कमावले होते.

त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या ३ दिवसांत चित्रपटाने १२.८० कोटी रुपयांची कमाई केली. ‘कबीर सिंह’चा धडाका असूनही अॅनाबेलने बॉक्स ऑफिसवर जम बसवल्याचे चित्र आहे.
‘आर्टिकल १५’ च्या व्यवसायाचा आकडाही १२.५० कोटी रुपयांवर पोहोचला असून, चित्रपटाची कामगिरी चांगली मानली जात आहे.
- Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?
- कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
- दिवाळीत कमाईची संधी ! ‘हे’ ३ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर पैसाच पैसा
- 365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख
- Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई