पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला आहे.

अशातच अर्थव्यवस्था सुस्तावल्याची आकडेवारी दिवसागणिक उजेडात येत आहे. त्यातच बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत मंदी येणे, हा एक नियमित प्रकार आहे. विशेषत: श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अर्थव्यवस्था मंदावत असते.
यात काहीही नावीन्य नाही. तरीही मंदीच्या मुद्यावरून विरोधकांद्वारे उगीचच अकांडतांडव करणे चुकीचे आहे. मंदीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. याकरिता ३२ सूत्री दिलासा पॅकेजची घोषणा केंद्राने केली आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
- प्रतिक्षा संपली ! महाराष्ट्र राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू , GR पण निघाला
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! मंत्री अदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती
- शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! पुणेकरांची प्रतीक्षा वाढणार, मार्च 2026 ची डेडलाईन
- रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधला ‘हा’ स्टॉक बनणार रॉकेट ! आनंद राठींकडून टार्गेट प्राईस जाहीर
- 1 जानेवारी 2026 पासून Cibil Score बाबत नवीन नियम लागू होणार ! कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?