नगर : आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारात असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुरू असलेली चर्चा अजूनही सुरूच आहे.
आ. जगताप हे मात्र त्याचा इन्कार करतात. पण आमदार जगताप जर शिवसेनेत आले तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. केडगावातील हत्याकांडात दोघा शिवसैनिकांचे प्राण गेले.

त्याला आमदार जगताप हेच जबाबदार असल्याची भावना शिवसैनिकांची आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव शिवालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. याशिवाय अनिल राठोड यांनाच उमेदवारी देण्याचा एकमुखी ठरावही त्यात आहे.
या ठरावातून राठोड यांनी विरोधक आमदार जगताप यांच्यासोबतच पक्षांतर्गत स्पर्धक शीला अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांचाही पत्ता कट करण्याची चाल खेळल्याची चर्चा आहे. या ठरावावर नगरसेवक व शिवसैनिकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. तो ‘मातोश्री’ वर धाडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
- सोन्याच्या दरांनी मोडला विक्रम; १० ग्रॅम सोनं थेट १.६ लाखांवर, लग्नसराईत ग्राहकांना मोठा फटका
- Samsung Galaxy Z Flip 7 Olympic Edition सादर; मिलानो कोर्टिना विंटर ऑलिंपिक्स 2026 साठी खास स्मार्टफोन
- एसबीआय म्युच्युअल फंड IPO ची लिस्टिंग २०२६ मध्ये होणार; काय आहे प्लॅन?
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता रखडला; २.८४ लाख शेतकरी प्रतीक्षेत
- भारत-ईयू मुक्त व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम; शेअर बाजार पुन्हा तेजीच्या रुळावर













