पुणे: गुरुवारी पहाटेच्या वेळी रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या तरुणीला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मद्यधुंद तरुणीला अटक केली असून, सोनल सुनिल सद्रे (३०,रा. सद्रेवाडा भराड गल्ली अहमदनगर) असे तिचे नाव आहे. तरुणीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एक तरुणी ज्ञानेश्वर पादुका चौकात दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या वेळी पोलिसांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केल असता तिने पोलिसांनाच शिवीगाळ करून मारहाण केली.
- मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ! मुंबईतील ‘या’ भागात लॉटरीविना म्हाडाचे घर मिळवण्याची सुवर्णसंधी
- आचारसंहितेच्या काळातही लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळणार का ? महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट
- पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! एकूण तीन टप्प्यात पूर्ण होणार प्रकल्प, कसा आहे संपूर्ण रूट?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू होणार का ? समोर आली मोठी अपडेट
- ब्रेकिंग : बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, आरबीआयची महाराष्ट्रातील ‘या’ तीन बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण