शिर्डी : नाशिक अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारताना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे आणि दोन खासगी व्यक्ती विनायक ऊर्फ सचिन उत्तमराव महाजन, मच्छिंद्र मारुती गायकवाड पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
शिर्डी येथील साई आसरा हाॅटेल समोर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक कार्यालयात अर्ज केला होता.

मात्र, प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाखांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने एसीबीच्या नाशिक कार्यालयात तक्रार केली. अहमदनगर व नाशिक पथकाने संयुक्तपणे शिर्डी येथे सापळा रचला. चालक महाजन, खासगी व्यक्ती मच्छिंद्र गायकवाड या दोघांना शिर्डी येथील हाॅटेल परिसरात पाच लाखांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ अटक केली.
- पाण्यावर उडणारी इलेक्ट्रिक बाईक! ‘Awake Navi’ ने मरीन ट्रान्सपोर्टमध्ये घडवली क्रांती
- फेब्रुवारी 2026 मध्ये कार बाजारात मोठी उलथापालथ; MG मॅजेस्टर, BMW X3, निसान ग्रेव्हिटसह अनेक नवीन गाड्या लाँच होणार
- शेतकऱ्यांना दिलासा देणारी दोन मोठी आश्वासने; कर्जमाफी आणि मोफत वीजेवर बावनकुळेंची स्पष्ट भूमिका
- गर्दीतून दिलासा! पश्चिम रेल्वेवर ४ नव्या लोकल फेऱ्या सुरू; वेळापत्रकात मोठा बदल
- म्हाडाकडून मुंबईत 120 सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध; 5 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू













