जामखेड: विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पळवापळवी सुरु असताना तिकीट न मिळाल्याने बंडखोरीलाही उधाण येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
आधीच शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचं संभाव्य आव्हान समोर राम शिंदें समोर आहे. त्यातच भाजपच्या गोटातील माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

नामदेव राऊत यांची बंडखोरी जवळपास निश्चित मानली जात आहे त्याचा पार्श्वभूमीवर महासंग्राम युवा मंचाच्या वतीने त्यांनी 9 तारखेला संकल्प मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात राऊत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांना पराभूत करुन विजय मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. राम शिंदे यांची आपला मतदारसंघ टिकवताना चांगलीच दमछाक होऊ शकते.
- Stock To Buy: लॉजिस्टिक क्षेत्रातील ‘हा’ शेअर्स मिळवून देऊ शकतो पैसा! नोट करा ब्रोकरेजने दिलेली रेटिंग आणि टार्गेट प्राईस
- Bonus Shares: ‘या’ 2 कंपन्या या आठवड्यात देणार बोनस शेअर्स! पटकन नोट करा रेकॉर्ड डेट
- Stock Split: अदानी ग्रुपची ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी देणार गिफ्ट! 5 वर्षात दिलेत 1505% रिटर्न…बघा अपडेट
- Share Market: ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांची केली माती! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर नाहीत ना? बघा यादी
- Smallcap Stocks: लॉन्ग टर्म गुंतवणुकीची मोठी संधी! ‘हे’ स्मॉल कॅप्स शेअर्स देतील 40% पर्यंत रिटर्न? बघा लिस्ट