बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील भाषणानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी समर्थक युवकांनी ‘एकच वादा– अजितदादा…’ अशी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंर्त्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन बारामती शहरात दुपारी साडेतीन वाजता झाले. या वेळी मुख्यमंर्त्यांच्या सभेपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. यानंतर मुख्यमंर्त्यांचे तेरा मिनिटांचे भाषण झाले.

या भाषणानंतर मुख्यमंत्री जनादेश यात्रेतील रथातून उतरून जात असताना काही अंतरावर असलेल्या युवकांनी एकच वादा… अजितदादा… अशा घोषणा दिल्या. या वेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार केला.
यानंतर घोषणाबाजी करणारे युवक पळाले. यातील काही युवकांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ युवकांनी ठाण मांडून घोषणाबाजी केली.
दरम्यान, मुख्यमंर्त्यांच्या जनादेश यात्रेत धनगर आरक्षण प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा देणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना अगोदरच पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. या कार्यकर्त्यांना एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
- भारतात 2026 मध्ये 100% दुष्काळ पडणार….! मार्च महिन्यातच हवामान बदलणार , युरोपातून समोर आला नवीन अंदाज, वाचा सविस्तर
- लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! १८व्या हफ्त्याची तारीख जाहीर, कधी जमा होणार पैसे?
- 100000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 45 हजार रुपयांचे व्याज! ‘ही’ आहे 2026 मधील पोस्टाची सुपरहिट योजना
- शेअर मार्केटमधील चढउतार गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! हे शेअर्स देणार 38% रिटर्न
- राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता….













