भुवनेश्वर : १ सप्टेंबरपासून देशात नवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर मोठमोठ्या रकमांचे चलन फाडले जात असल्याचे वृत्त दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळत आहे.
ओडिसामधील संभलपूर येथे शनिवारी एक नवीन प्रकरण समोर आले असून, वाहतुकीचे नियम तोडल्याच्या कारणावरून नागालँडच्या एका ट्रकमालकाला ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ही देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. संभलपूर येथील आरटीओने ट्रक नंबर एनएल ०८ डी ७०७९ चा चालक दिलीप कर्ता आणि ट्रकमालक शैलेश शंकरलाल गुप्ता यांच्यावरही दंडाची कारवाई केलेली आहे.
ट्रकमालक शैलेश शंकरलाल गुप्ता याने २० जुलै २०१४ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठीचा, म्हणजे जवळपास मागील पाच वर्षांपासूनचा रोड टॅक्स दिलेला नाही. हा रोड टॅक्स ६ लाख ४० हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे.
याशिवाय ध्वनि प्रदूषण,वायू प्रदूषण, गाडीचा विमा, विनापरवाना गाडी चालवणे, अशा चुकांसाठीचा लावण्यात आलेला दंड मिळून एकूण रक्कम ६ लाख ५३ हजार १०० रुपयांच्या घरात पोहोचलेली आहे. हा देशातील सर्वात मोठा दंड असल्याचे बोलले जात आहे.
- Vivo S50 आणि S50 Pro Mini ‘या’ तारखेला लाँच होणार ! समोर आली मोठी अपडेट
- वीकेंडची सोय झाली…..! 14 नोव्हेंबरला OTT वर रिलीज झाल्यात 3 नवीन वेबसीरिज आणि मूवीज !
- सावधान ! मूळ्यासोबत चुकूनही ‘या’ गोष्टींचे सेवन करू नये, नाहीतर…..; तज्ञांनी दिली मोठी माहिती
- टोलनाक्यावर आता फास्टॅगसोबत गुगलपे, फोनपेने सुद्धा पैसे देता येणार ! 15 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार नवा नियम
- रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला दिली मोठी भेट! या शहरांमधून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?












