नगर : नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी विक्रम उर्फ बाळासाहेब हरिदास काळे (वय ५०) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाऊस न झाल्याने नापिकी, कर्जबाजारीपणामुळे काळे यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्याने शेतातील पीक वाया गेले आहे.

त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काळे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील ठिबक सिंचनाच्या पाइपच्या सह्याने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार ? कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार लाभ, CM फडणवीस यांनी सांगितला प्लॅन
- मुंबई – पुणे प्रवास फक्त ९० मिनिटात ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली दुसऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेसवेची घोषणा
- शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय ! 25% सवलतीत उपलब्ध होणार नवीन घरे, अर्ज कुठे करावा लागणार?
- वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी बातमी ! ‘या’ शहराला मिळणार नवीन वंदे भारत ट्रेन, कसा असणार रूट ?
- 2025 मध्ये ‘या’ 5 शेअर्सने दाखवला जबरदस्त जलवा ! गुंतवणूकदारांना मिळालेत 6000% पेक्षा जास्त रिटर्न













