भोपाळ: मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने एकाच दुकानातून गाईचे दूध व कडकनाथ कोंबड्याचे मांस व अंडी विकण्याची योजना सुरू केली आहे.
सरकारी पार्लरमधून मिळणारे चिकन व गाईचे दूध यांच्या शुद्धतेची १०० टक्के हमी आहे, असा सरकारचा दावा आहे. सरकारच्या वतीने पहिले दुकान भोपाळमधील नेहरूनगर भागात सुरू करण्यात आले आहे. परंतु या योजनेवर भाजपने आक्षेप घेतला आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार रामेश्वर शर्मा यांनी म्हटले, हिंदू धर्मात गाय व तिचे दूध पवित्र मानले जाते. याचा उपवासासाठी तसेच अनेक सणात वापर करण्यात येतो.
जो माणूस चिकन विकतो तोच गाईचे दूध कसे विकू शकतो? यामुळे दोन्ही दुकाने वेगळी करावीत, दोन्ही दुकानाचे मालक वेगळे असावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पशुपालनमंत्री लाखनसिंह यादव यांनी म्हटले, भाजपचे आरोप निराधार आहेत.
चिकन पार्लर व मिल्क पार्लरदरम्यान पार्टीशन आहे. एका भागात कडकनाथचे मांस व दुसऱ्यामध्ये गाईचे दूध विकतात.
- शेअर मार्केटमधील अस्थिरता रिलायन्स समूहाच्या ‘या’ शेअर्ससाठी वरदान ! मुकेश अंबानीचा स्टॉक व्हेनेझुएला संकटात पण सुपरहिट
- फोन पे , गुगल पे वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवल्यास ते पैसे परत कसे मिळवायचे ? पहा….
- गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! 400 रुपयांचा शेअर 40 रुपयांना ; ‘या’ तारखेपर्यंत Share खरेदी केल्यास मिळणार लाभ
- महापालिका मतदानाच्या आधी लाडक्या बहिणींना मिळणार मोठी भेट ! खात्यात जमा होणार एवढी रक्कम
- नाशिकच्या कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण ! 2 दिवसात गुंतवणूकदारांना बसला 40 टक्क्यांचा फटका, घसरणीचे कारण काय?













