नवी दिल्ली : फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेलवर बंदी घालावी, अशी मागणी करणारे पत्र कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (काईट) या व्यापारी संघटनेने केंद्राला दिले आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांना काईटने पत्र पाठवून यासंदर्भातील मागणी केली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकडून देण्यात येणारी प्रचंड सूट थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणाचे उल्लंघन करणारी आहे.

या कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेल प्रकरणात अथवा प्रचंड मोठ्या प्रमाणात सूट देणाऱ्या इतर कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये आपण तातडीने लक्ष घालावे. वस्तू अथवा सेवा यांच्या विक्री किमतीवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभाव पाडण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना बंदी आहे. तरीही या कंपन्या भरमसाठ सूट देऊन किमतींवर परिणाम करीत आहेत.
हा उघड उघड नियमभंग आहे. सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्या सवलतीत मोठी वाढ करत आहेत. त्यामुळे त्यांच्या फेस्टिव्हल सेलवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे काईटने आपल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे या पत्रात फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या कंपन्यांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे.
- शेतकरी जिंकलेत, शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकार नरमले ! मुख्यमंत्री फडणवीस यांची शक्तीपीठ महामार्गाबाबत मोठी घोषणा, आता….
- महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ‘या’ तारखेपासून सुरू होणार शासकीय हमीभावात खरेदी
- EPFO च्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर किती पेन्शन मिळणार ? EPFO पेन्शनचे नियम कसे आहेत?
- केंद्राच्या तसेच राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी ! मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ
- ब्रेकिंग : महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना आता ‘हे’ तृणधान्ये मोफत दिले जाणार !