सातारा :- देशात रोजगार नाहीत त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे डोळेझाक करून भाजप सरकार काश्मीरमधील ३७० कलमासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत आहे.
हे त्यांनी थांबवावे आणि नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता हे जाहीर करावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात आज आर्थिक मंदी आहे, रोजगार उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हे जनतेला दिवास्वप्न दाखवत सुट आहेत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- Post Office च्या RD योजनेत 5 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? वाचा सविस्तर
- आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार ? कर्मचाऱ्यांना आणखी किती महिने वाट पाहावी लागणार?
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! पीएम किसानचा 21 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार ! समोर आली मोठी अपडेट
- दररोज 30 रुपये वाचवा अन 1.17 कोटी रुपये मिळवा ! वाचा सविस्तर
- पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाचे अपडेट ! समृद्धीनंतर आता Ring Road वर पण विकसित होणार ‘ही’ सुविधा