लंडन : कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेता न येणे आणि धीर खचण्यामागे भूक हेही कारण असू शकते. स्कॉटलंडमधील डुंडी विद्यापीठाच्या अध्ययनातून असे समोर आले आहे की, कामाच्या ठिकाणी मनुष्याची भूक त्याची निर्णय घेण्याच्या क्षमतेला बदलू शकते.
जे लोक जेवण करून ऑफिसला जातात, ते योग्य निर्णय घेतात. या अध्ययनात ५० लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना खाणेपिणे व पैसा व पुरस्कारासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. एकदा हे लोक भुकेले असताना आणि दुसऱ्यांदा भरल्यापोटी त्यांना ही विचारणा करण्यात आली.

त्यात असे दिसून आले की, जे लोक सामान्य रुपात जेवण करत होते, ते आपला संयम व निर्णयक्षमता ३५ दिवस टिकवू शकले. दुसरीकडे ज्यांनी जेवण केले नव्हते, त्यांचा संयम तीन दिवसांतच तुटला.
या अध्ययनाचे प्रमुख डॉ. बेंजामिन विन्सेंट यांनी सांगितले की, उपाशीपोटी व्यक्ती कसा व काय विचार करतो, हा या अध्ययनाचा हेतू होता. त्यात असे दिसून आले की, भूक माणसाच्या प्राथमिकता बदलून टाकते.
त्याचा त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होतो. हे संशोधन मुलांवरही लागू होते. बऱ्याचदा मुले शाळेत जातेवेळी न्याहारी करत नाहीत. अनेक लोक कॅलरी कमी करण्यासाठी डाइटिंग करतात. दुसरीकडे काहीजण उपवास करतात, त्यांच्या या सवयीचा भविष्यात परिणाम पाहिला जाऊ शकतो. ही सवय त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेला प्रभावित करू शकते.
- ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स ! दररोज ऑफिसमध्ये जाण्यासाठी ठरतील बेस्ट
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ऑक्टोबर महिन्याच्या वेतनाबाबत सरकारचा मोठा निर्णय
- महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 31 हजार रुपयांचा बोनस ! वाचा डिटेल्स
- Bank Of Maharashtra सह ‘या’ बँका होणार आता इतिहासजमा ! सरकारचा एक निर्णय ठरणार गेमचेंजर
- धनतेरसला सोन खरेदी करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! शुद्ध सोने कसे तपासावे ?