नाशिक :- परराज्यातून कांद्याची मागणी वाढल्याने गुरुवारी (दि. १९) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दराने मोठी उसळी घेत पाच हजारांचा आकडा पार केला. यापूर्वी ऑगस्ट २०१५ मध्ये कांद्याला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी एकूण १२ हजार क्विंटल आवक होऊन सकाळच्या सत्रात १३०० ते ५१०० व सरासरी ४६०० रुपये, तर दुपारच्या सत्रात १५०१ ते ५१०० व सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नवा लाल कांदा बाजारात येण्यास अजून दोन महिने वाट पाहावी लागणार आहे.

त्यातच उन्हाळ कांद्याची आवक घटल्याने या आठवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या बाजारभावामुळे मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.
- SBI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र…; ‘या’ 15 बँकांचे मिस कॉलद्वारे बॅलन्स चेक करण्यासाठी टोल फ्री नंबर्सची यादी पहा….
- कबुतरांना घरापासून लांब पळवण्यासाठीच्या 5 सोप्या ट्रिक्स ! परत कधीच तुमच्या बाल्कनीत कबुतर दिसणार नाही…
- 78 वर्षात जे घडलं नाही ते होणार…; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणारा ‘हा’ नियम, वाचा..
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी लवकरच पूर्ण होणार ! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ
- प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी कुठं अन कधी जाल ? वाचा सविस्तर













