पारनेर :- विकासनिधीच्या माध्यमातून विकासाभिमुख कामे करणे हेच आपले उद्दिष्ट असून राजकारणापेक्षा आपण समाजकारणाला महत्त्व देत असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील देवीभोयरे गावठाण ते तुकाईवाडी मगरदरा रस्ता डांबरीकरण १५ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. या वेळी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी माजी सभापती गंगाराम बेलकर, ॲड. बाबासाहेब खिलारी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाषराव बेलोटे, लहू भालेकर, नंदू भालेकर, मोहनराव रोकडे, तुकाराम बेलोटे, शिवाजी बेलोटे, अशोक मुळे, विठ्ठलराव सरडे, संपतराव वाळुंज, सुभाष बेलोटे, जयंतराव मुळे, सीताराम बेलोटे, साठे गुरुजी, आदी उपस्थित होते.
- 8 जानेवारीपासून हवामानात मोठा बदल, काही भागात कडाक्याची थंडी अन् काही भागात धो धो पाऊस; वाचा हवामान खात्याचा अंदाज
- HDFC Life, डाबर इंडियासह ‘हे’ 3 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न! टॉप ब्रोकरेज हाऊसकडून मिळाली बाय रेटिंग
- 60 टक्क्यांची घसरण झालेल्या ‘या’ शेअर्समध्ये आशिष कचोलियांची मोठी गुंतवणूक ! आता शेअर्समध्ये आली तुफान तेजी
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! किमान पेन्शनमध्ये तब्बल पाचपट वाढ होणार, प्रस्तावाला लवकरच मिळणार मंजुरी
- मकर संक्रांतीच्या दिवसापासून ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार ! हातात येणार भरपूर पैसा, गाडी अन बंगल्याचे स्वप्न पण पूर्ण होणार













