श्रीरामपूर : श्रीरामपूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मासिक हप्ता म्हणून चार हजार रुपये घेताना अहमदनगर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई याबाबत लाचलुचपत विभागाच्या वतीने सांगण्यात आले, की तक्रारदार यांचा श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर मिल्क स्टॉल आहे.

हा स्टॉल चालू राहाण्याकरीता मासिक हप्ता म्हणून पोलीस नाईक वैजनाथ पांडुरंग बडे (वय ३७, नेमणूक श्रीरामपूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र, रा. वॉर्ड नं. ७, निर्मल क्लासेससमोर, श्रीरामपूर) याने पाच हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. .
या तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर सापळा लावला. यावेळी पंचांसमक्ष चार हजार रुपये बडे याने स्वीकारले. यावेळी त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. याचे छायाचित्रही घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
- Stock To Buy: लॉजिस्टिक क्षेत्रातील ‘हा’ शेअर्स मिळवून देऊ शकतो पैसा! नोट करा ब्रोकरेजने दिलेली रेटिंग आणि टार्गेट प्राईस
- Bonus Shares: ‘या’ 2 कंपन्या या आठवड्यात देणार बोनस शेअर्स! पटकन नोट करा रेकॉर्ड डेट
- Stock Split: अदानी ग्रुपची ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी देणार गिफ्ट! 5 वर्षात दिलेत 1505% रिटर्न…बघा अपडेट
- Share Market: ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांची केली माती! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर नाहीत ना? बघा यादी
- Smallcap Stocks: लॉन्ग टर्म गुंतवणुकीची मोठी संधी! ‘हे’ स्मॉल कॅप्स शेअर्स देतील 40% पर्यंत रिटर्न? बघा लिस्ट