अहमदनगर : काटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा ट्रक व दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रवी संजय बर्डे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, काटवन खंडोबा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे मिळाली होती.

त्यावरून पोलिसांच्या पथकाने सायंकाळी सहा वाजता काटवण खंडोबा रोडवरील गाझीनगर येथे दोन ब्रास वाळूसह टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच ०४, ईबी ७२६५) जप्त केल. या कारवाई ४लाख २० हदार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी रवींद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरून रवी बर्डे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ढगे हे करीत आहेत.
- iPhone 18 Pro आणि Pro Max बद्दल मोठी अपडेट! सप्टेंबर 2026 मध्ये लाँच, पहिला फोल्डेबल आयफोनही येणार?
- सूर्यप्रकाशावर चार्ज होणारी इलेक्ट्रिक कार! Nissan Ariya Solar Concept ने उघडली भविष्यातील ईव्हीची नवी वाट
- मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत! हाय-स्पीड रेल्वेने महाराष्ट्राच्या दळणवळणात ऐतिहासिक बदल
- खाजगी वाहनांसाठी FASTag वरून ‘KYV’ अट रद्द; 1 फेब्रुवारी 2026 पासून नवीन नियम लागू
- १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींना मंजुरी; ८ व्या वेतन आयोगाबाबत प्रतीक्षा कायम













