श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील भीमानदीपात्रातील बेटावर अंदाजे३५वर्षीय अनोळखी पुरुषाचा वाहून आलेला मृतदेह पोलिसांना सापडला आहे.
नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पोलिसांनी स्पीडबोटीच्या मदतीने हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल.परंतु सदरचा मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला असल्यामुळे जागेवरच पंचनामा करत पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली.

या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत, त्यामुळे सदर इसमाचा मृत्यू पाण्यात बुडुन झाला असण्याची श्यक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी आलेल्या महापुरात अनेकजण वाहून गेले होते.
त्यापैकी एखाद्या व्यक्तीचा हा मृतदेह असण्याचा प्राथमिक अंदाज श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
- दिवाळीत वरुणराजाची हजेरी ! ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता
- ‘या’ आहेत 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या Top 5 Car
- दिवाळीत बायकोच्या नावाने ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, प्रत्येक महिन्याला मिळणार 6 हजार 167 रुपयांचे व्याज
- पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- आनंदाची बातमी ! ‘या’ कारवर मिळतोय 52 हजार 500 रुपयांचा डिस्काउंट