सोलापूर :- जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे.
भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.

श्याम होळे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृत तरुण हा बार्शीतील शेलगाव होळे गावातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांकडू देण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली आहे.
धक्कादायक म्हणजे कोणाला अपघाताबद्दल समजू नये यासाठी तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून गाडीची नंबर प्लेट काढून ठेवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा तपास करत आहेत.
- 7वा वेतन आयोगासारखं 8व्या आयोगात होणार नाही ! कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणारच नाही ? सरकारच्या भूमिकेने कर्मचारी चिंतेत
- 2026 मध्ये चांदीची किंमत अडीच लाख रुपये प्रति किलो होणार ? तज्ञांचा अंदाज काय सांगतो
- महाराष्ट्रातील ‘हे’ दोन जिल्हे जोडणारा नवीन रेल्वेमार्ग तयार होणार ! नव्या प्रकल्पाचा 30 लाख नागरिकांना होणार फायदा
- पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार, मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली अपडेट
- राज्यातील लाडक्या बहिणींसाठी चिंताजनक बातमी ! नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार, कारण काय ?













