अहमदनगर :- विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये खिंडार पडायला सुरुवात झालेली असतानाच स्थानिक पातळीवर अंतर्गतवाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळला आहे.
प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज आपल्यापदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती किरण काळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मी गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो. पक्षातील स्थानिक नेतृत्व नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही,
मला आणि सामान्य नगरकरांनी प्रतीक्षा असणाऱ्या नगर विकासाच्या दृष्टीने मी लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. याच कारणामुळे मी माझ्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे आज दिला असेही काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
समाजातील नेतृत्व करण्यासाठी शहरात दूरदृष्टी असलेल्यांना नेतृत्व दिले जावे यासाठी देखील पक्षात कायम आग्रह धरत होतो. परंतु यामध्ये दुर्देवाने मागील अप्रिय निर्णय निर्णयाची पुनरावृत्ती होताना दिसत असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगून देखील स्थानिक नेतृत्वाने पक्षविरोधी निर्णय घेतला होता.
कायम पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आता देखील सर्व पक्षांचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर स्वतःच्या प्रसिद्ध कार्य कौशल्यामुळे आपल्याला कोणीही कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रवादीची आठवण झाली, असा टोला त्यांनी विद्यमान आमदारांचे नाव न घेता यावेळी लगावला आहे.
पक्षनिष्ठा काय वेशीवर टांगण्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय असू शकते असा सवालही काळे यांनी यावेळी उपस्थित केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील जातीने लक्ष घालून आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक नेतृत्व आणि माझ्याकडे असलेल्या टोकाच्या वैचारिक तफावतीमुळे त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे मला कधीच वाटले नाही,
त्यामुळे शहर विकासासाठी मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असून आज मी माझ्या पदाचा तसेच सदस्य पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पुढील राजकीय वाटचालीची सुद्धा लवकरच घोषणा करणार असल्याचे किरण काळे यांनी यावेळी सांगितले.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ