अहमदनगर – थंडगार पडलेली शिवसेनेची बुलंद तोफ अंबादास पंधाडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. अनिल राठोड यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर होताच पंधाडे त्यांच्या भेटीसाठी शिवालयात पोहोचले.
पंधाडे यांचा मुलगा सारंग हे मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे खास कार्यकर्ते आहेत. नगरच्या राजकारणात ‘बाप इकडं आणि बेटा तिकडं’ असं चित्र यानिमित्ताने दिसून आलं. बाप इकडं बेटा तिकडं लहानपणापासूनच रक्तात भिनलेले हिंदुत्व घेऊन अंबादास पंधाडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत.

नगरसेवकपदापुरतीच धाव असलेले पंधाडे यांची बुलंद तोफ गेल्या ५ वर्षांपासून थंडावली होती. याचदरम्यान त्यांचा मुलगा सारंग हे राष्ट्रवादीत सक्रिय झाले . अंबादास पंधाडे यांनी राजकीय विजनवास घेतला तरी शिवसेना मात्र सोडली नव्हती. तात्विक मतभेदांमुळे ते राठोडापासून दुरावले होते.
- सोनं पुन्हा चमकलं ! 19 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
- ब्रेकिंग ! आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- सरकारच्या योजनांचा लाभ पारधी समाजापर्यंत थेट पोहोचवा, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे निर्दैश
- अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याचे २७ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन
- सायकलवर घराकडे निघालेल्या इसमाचा कोल्हार पुलावर ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार