राहुरी :- मुलीस घटस्फोट देत नाही, या कारणावरून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दोन कुटुंबात जोरदार हाणामाऱ्या झाल्या. यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले आहेत. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक देशमुख (पूर्ण नाव माहीत नाही), सुनीता अशोक देशमुख, दीपक अशोक देशमुख (सर्व रा. वळण, ता. राहुरी), विलास शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही), हिरा विलास शिंदे (दोन्ही रा. खिर्डी, ता. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आरोपी पूनम गणेश तेलोरे (वय २२, रा. ब्राम्हणी) हिच्या घरच्या लोकांना म्हणाले, तुम्ही आमच्या मुलीला घटस्फोट का देत नाही. असे म्हणून अशोक देशमुख याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने पूनमचे सासरे बापूसाहेब तेलोरे यांच्या डोक्यात मारले व दीपक देशमुख याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने पायावर, हातावर मारले. तसेच पूनमचा भाया रवींद्र बापूसाहेब तेलोरे यांना विलास शिंदे यांच्या हातातील लोखंडी पाईपने पाठीवर, पायावर मारहाण केली.

त्यानंतर पूनम व तिची सासू मंगल या दोघींना सुनीता देशमुख व हिराबाई शिंदे यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर तुम्ही आमच्या मुलीला घटस्फोट दिला नाही, तर तुमचा एक एकाचा मुडदा पाडीन, असा दम दिला. याप्रकरणी पूनम तेलोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरील वरील आरोपींविरुद्ध राहुरी पोलिसांत गु. र. नं. ७९२/२०१९ भा. दं. वि. कलम ३२६, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ मु. पो. का. कलम ३७ (१), (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?
- कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
- दिवाळीत कमाईची संधी ! ‘हे’ ३ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर पैसाच पैसा
- 365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख
- Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई