नगर : ‘निवडणुका सुरु झाल्या आहेत. विरोधक भावनिक आरोप व आवाहन, जाती-पातीचे राजकारण करण्याबरोबरच खोटे आरोप करून तेढ निर्माण करतील.
मात्र, खोटे आरोप व जाती-पातीचे राजकारण करणाऱ्यांना माझे आव्हान आहे, समोरासमोर येऊन चर्चा करा, मग पाहू कोण किती खरे आहे ते. यासाठी कधीही व कोठेही बोलवा मी तयार आहे,’ असे आव्हान आ. संग्राम जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात दिले.

‘गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मी पक्ष बदलणार असल्याबाबतचे मेसेज मुद्दाम व्हायरल करून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला आहे. मात्र, मी पूर्वीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसशी बांधील असून, एकनिष्ठ आहे.
पाच वर्षांपूर्वी आलेल्या लाटेतही जनतेने मला विश्वासाने निवडून दिले. त्यामुळेच नगर शहराला विकासाची गती देऊ शकलो,’ असा दावाही त्यांनी केला.
- Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?
- कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
- दिवाळीत कमाईची संधी ! ‘हे’ ३ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर पैसाच पैसा
- 365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख
- Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई