नगर : पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून, तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात मंगळवारी एकूण सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले.
मंगळवारअखेर एकूण १७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बारा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून तब्बल ११३ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. मंगळवारी कर्जत-जामखेड मतदारसंघातून प्रा.राम शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले.

बबनराव पाचपुते यांनीही श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपकडून अर्ज दाखल केला. नेवासा मतदारसंघात नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पक्ष व एक अर्ज अपक्ष असे एकूण दोन अर्ज, पारनेर मतदारसंघात भाऊसाहेब माधव खेडेकर यांनी अपक्ष आणि निलेश ज्ञानदेव लंके यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला.
- ब्रेकिंग ! आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- सरकारच्या योजनांचा लाभ पारधी समाजापर्यंत थेट पोहोचवा, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे निर्दैश
- अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याचे २७ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन
- सायकलवर घराकडे निघालेल्या इसमाचा कोल्हार पुलावर ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार
- संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील खरा काटेरी सुत्रधार कोण आहे हे ओळखा- माजी मंत्री बाळासाहेब थोरात