अहमदनगर :- राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या उमेदवारीला माजी महापौर अभिषेक कळमकर व त्यांचे काका माजी आमदार दादा कळमकर यांनी आव्हान दिले आहे.
युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळेही शर्यतीत होते. पण पक्षाची उमेदवारी जगतापांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर काळेंनी पक्षाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली.

या पार्श्वभूमीवर आता माजी महापौर कळमकर काय करणार, याची उत्सुकता आहे. गुरुवारी जगतापही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे त्यांच्यासमवेत कळमकर काका-पुतणे उपस्थित राहतात की नाही, याची उत्सुकता आहे.
यावरून त्यांचीही भूमिका स्पष्ट होणार आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याच्यावेळी जगताप समर्थक व कळमकर यांच्यातील वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी जगतापांसमवेतच्या कळमकरांच्या उपस्थिती-अनुपस्थितीची व त्यातून स्पष्ट होणाऱ्या त्यांच्या भूमिकेची उत्सुकता शहरात आहे.
- आयुष्मान कार्डचा वापर करून एका वर्षात कितीदा मोफत उपचार घेता येतात ? वाचा सविस्तर
- 2024 मध्ये ज्या शेअर्सने मालामाल बनवल त्याच शेअर्सने 2025 मध्ये बुडवलं ! ‘या’ 3 शेअर्समध्ये झाली 60 टक्क्यांपर्यंत घसरण
- मुंबईतील एका बड्या कंपनीची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! दिग्गज रिअल इस्टेट कंपनी देणार मोफत शेअर्स
- .……तर भारतीय कर्मचाऱ्यांना मिळणार सहा महिन्यांची फुलपगारी सुट्टी ! कारण काय ?
- नाशिक ते बोरीवली प्रवास होणार सुसाट….! समृद्धी महामार्गावरून धावणार नवीन बस













