लखनौ : उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात मुबलक पाऊस पडला आहे. हा मुबलक पाऊस पडण्यामागे योगी सरकारच्या काळात गोहत्येमध्ये झालेली घट कारणीभूत आहे. गोहत्येमध्ये घट झाली म्हणूनच कुठेही दुष्काळ जाणवला नाही आणि पाऊसही समाधानकारक पडला असल्याचा दावा उत्तरप्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केला आहे.
निषाद म्हणाले,जेव्हापासून उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार बनले आहे, तेव्हापासून राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद झाले, तसेच राज्यात गोहत्येचे प्रमाणही कमी झालेले आहे. याची फलनीती म्हणजे निसर्गाने भरपूर साथ दिली आणि प्रचंड पाऊस पडला, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील पशुसंवर्धन मंत्री जयप्रकाश निषाद यांनी केले आहे.

यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि विभागाच्या कामगिरीची माहिती दिली. तसेच मत्स्यपालनासाठी मच्छीमारांना डोळ्यांसमोर ठेवून उचललेल्या पाऊलाची माहितीही निषाद यांनी यावेळी दिली.
- धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करणे योग्य ठरणार का ? तज्ज्ञांचा सल्ला काय
- FD चा नाद सोडा ! Post Office च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा अन मिळवा 4.5 लाखांचे व्याज
- ‘हे’ 5 शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करा ! 12 महिन्यात मिळणार 24 टक्क्यांचे रिटर्न
- सरकारी कर्मचाऱ्यांची दिन दिन दिवाळी ! दीपोत्सवात किती दिवस राहणार सुट्ट्या? समोर आली यादी
- ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक्स ! दररोज ऑफिसमध्ये जाण्यासाठी ठरतील बेस्ट