अहमदनगर :- भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची नगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार इच्छा होती. त्यासाठीची आवश्यक तयारीही त्यांनी केली होती. पक्षाचा ‘एबी’ फॉर्म आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी तसेच खासदार डॉ. सुजय विखेंचे दूत नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंना भेटून अर्ज न भरण्याची सूचना केली आणि वाकळेंची इच्छा ‘थंडावली’. त्यानंतर ‘पक्षादेशानुसार निवडणुकीत काम करणार’, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

नगरची शिवसेनेकडे असलेली जागा भाजपकडे घेऊन पक्षाकडून येथे उमेदवारी करण्याची मनीषा वाकळे यांच्यासह माजी खासदार दिलीप गांधी, त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांची होती.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांनी घरी येऊन त्यांची भेट घेतली व नगरमधून पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायचा नाही, असा पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्याचे त्यांना सांगितले.
त्यानंतर काही वेळाने नगरचे नवे खासदार डॉ. सुजय विखे यांचे दूत म्हणून नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंची भेट घेतली व अर्ज भरू नका, असा डॉ. विखेंचा निरोप असल्याचे स्पष्ट केले. या दोन सूचनांनंतर वाकळेंनी अर्ज दाखल करण्याचा विचार सोडून दिला.
- तुमच्या पत्नीसोबत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत अकाउंट ओपन करा, प्रत्येक तीन महिन्यांनी मिळणार 61 हजार 500 रुपयांचे व्याज
- सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार?
- SBI की HDFC कोणती बँक देते सर्वात स्वस्त गृहकर्ज ! अर्ज करण्याआधी एकदा वाचाच
- HFCL Share Price: 1 आठवड्यात केले मालामाल! 11.48% चा घसघशीत परतावा…‘हा’ स्टॉक आज फोकसमध्ये
- GTLINFRA Share Price: 2 रुपयापेक्षा कमी किमतीचा ‘हा’ शेअर आज करणार मालामाल? बघा ट्रेडिंग पोझिशन