अहमदनगर :- श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने माजीमंत्री बबन पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

पारनेरमध्ये शिवसेनेच विजय औटी यांच्यासाठी सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. तो त्यांनी मागे घेतला. यासह याच मतदारसंघात राष्ट्रवादीत नाराज असलेले सुजित झावरे यांनी अर्ज दाखल केला होता.मात्र, त्यांनी देखील अर्ज मागे घेतला.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातही भाजपमधून बाहेर पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला केला. लोकसभा निवडणुकीत काकडे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आल्या होत्या. पण, त्या राष्ट्रवादीत सक्रिय झाल्या नाहीत. परंतु त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. यासह नेवाशातून माजी सभापती सुनीता गडाख यांनी माघार घेतली.
- वाईट काळ संपला! 6 नोव्हेंबर 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार, मिळणार जबरदस्त यश
- पुणेकरांचा प्रवासाचा कालावधी वाचणार! आता थेट बोगद्यातून धावणार मेट्रो, कसा राहणार रूट?
- पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार जबरदस्त परतावा ! 5 वर्षात 10 लाखांचा नफा…
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी! ‘ही’ कंपनी देणार प्रत्येक शेअरवर 75 रुपयांचा Dividend, रेकॉर्ड डेट नोट करा
- JEE, NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च महाराष्ट्र राज्य सरकार उचलणार ! कोणाला मिळणार लाभ? नवा प्रस्ताव समोर