औरंगाबाद :- मराठवाड्यातील जालना येथील रश्मी देशपांडे या तरुणीने अटकेपार झेंडा फडकवला आहे. फेसबुकने तब्बल तिला ८० लाख रुपयांचे पॅकेज, शिवाय कंपनीचे २१ लाखांचे शेअर्सही दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ती आयर्लंड येथे फेसबुकच्या कार्यालयात रुजू होणारआहे.
३१ वर्षीय रश्मीने जालन्याच्या नवयुवक गणेश विद्यालय, श्री. म. स्था. जैन विद्यालयातून दहावी तर जेईएस महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठात बी. ई. पदवी मिळवली. स्वीडन, फिनलँड, फ्रान्स आणि अमेरिकन कंपन्यांमध्ये काही काळासाठी नोकरी केली.

जुलै महिन्यात फेसबुकने भारतातून उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली. देशभरातून हजारो तरुणांनी यामध्ये भाग घेतला होता. या निवडीच्या ५ तांत्रिक तर २ अतांत्रिक फेऱ्या झाल्या. शेवटी व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याची फेरीही झाली.
प्रत्येक फेरीत रश्मी आघाडीवर राहिली. देशभरातून निवड होणारी ती एकमेव तरुणी आहे. आयर्लंड येथील निवासाची व्यवस्थाही फेसबुक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तिच्या निवडीने मराठवाड्याची खासकरून जालन्याची शान वाढली आहे.
- 1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 22 हजार रुपयांचे व्याज ! सरकारी बँकेची एफडी योजना ठरणार गुंतवणूकदारांसाठी फायद्याची
- काय सांगता! फक्त 60 मिनिटात पुण्याहून गोव्याला आणि गोव्यातून पुण्याला याल, ‘ही’ आहे जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन
- शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारच्या तिजोरीत पैसाचं उरला नाही ! महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देणे झाले बंद, पहा…
- नवीन वर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी, ‘या’ 5 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्राच हवामान कस राहणार?
- नवीन वर्षाआधी गोवा आणि राजस्थान दर्शनाला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय! महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन