नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले.
नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या माळीवाडा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. नगरकरांनी मला संधी दिली.

नगरकरांनी दिलेल्या या संधीमुळेच पाच वर्षांत शहरातील उपनगरांमध्ये चांगल्या पध्दतीचे काम करू शकलो. नगर शहर उपनगरात अनेक विकासकामातून एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
त्याच माध्यमातून तरुण पिढीला आयटी पार्कच्या माध्यमातून पाच वर्षांत ४०० ते ५५० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. या वेळी प्रा. अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक अविनाश घुले, निखिल वारे, उबेद शेख, राधेश्याम शर्मा आदींची भाषणे झाली.
- राज्यातील दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! सरकारचा परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय
- आनंदाची बातमी ! राज्यातील नागरिकांना पाणीपट्टी अन घरफाळामध्ये 50% सवलत मिळणार, फडणवीस सरकारचा निर्णय
- मध्यमवर्गीयांसाठी केंद्रातील सरकार घेणार मोठा निर्णय ! मिळणार 3 लाख रुपयांची आर्थिक सवलत?
- मुंबई हायकोर्टाचा नवा निर्णय चर्चेत ! वारसा हक्काने मिळालेल्या जमिनी बाबत मोठा निकाल
- चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चिंताजनक ! चांदीच्या किमतीत 60 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता, वाचा सविस्तर…