नगर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियाचा वापर सर्वचर राजकीय पक्ष आणि नेते करताना दिसत आहेत . शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा प्रचार नगर शहर मतदारसंघात शिगेला पोचला आहे . त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले.
शिवसेनेची जाहिरात करणारे हे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये हे व्हिडीओ धुमाकूळ घालत आहेत.

प्रत्येक निवडणुकीत सोशल मीडिया एक हत्यार म्हणून वापरले जाते . तरुणाईला साद घालण्यासाठी हे एक सोप्पे माध्यम आहे . त्याचा खुबीने वापर केला जात आहे .
“झालेला प्रकार विसरलो नाही… आम्ही आया बहिणींचा कुंकू पुसणारा नकोय… आया बहिणींचं रक्षण करणारा पाहिजे… डुप्लिकेट नको , ओरिजिनल भैया पाहिजे …. “अशा आशयाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे . केडगाव हत्याकांडाशी साधर्म्य सांगणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
तरुणांच्या रोजगारासंबंधात भाष्य करणारा अजून एक व्हिडीओ प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे . “निवडणुकीच्या तोंडावर खोट्या कंपन्या उभारून नोकरीचं आमिष दाखवणारा नको… खरंच तरुणांना रोजगार देणारा पाहिजे…. डुप्लिकेट नको; ओरिजिनल भैया पाहिजे…”
नगर शहरात आयटी पार्क हा मुद्द्दा देखील निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे . त्यावर एकतर्फी भाष्य करणारा आणि पडद्याआडून टीका करणारा हा व्हिडीओ शिवसेनेने सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.
असे व्हिडीओ व्हायरल करून ओरिजिनल आणि डुप्लिकेट भैय्या असा कलगीतुरा रंगवला जात आहे आणि त्याद्वारे मतदारांना साद घातली जात आहे .
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांच्यात नगरमध्ये दुरंगी लढत होत आहे . हा मतदारसंघ देखील राज्यातील होत मतदारसंघांपैकी एक मानला जातो .
कोण ओरिजिनल आणि कोण डुप्लिकेट हे जनता ओळखून आहे . पण या व्हिडीओंनी मात्र सोशल मीडियावरचे राजकीय मैदान चांगलेच तापवले आहे .. असे असले तरी कोण डुप्लिकेट आणि कोण ओरिजिनल हे मात्र २४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे .
पहा हा व्हिडीओं या लिंक वर
- मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गबाबत मोठे अपडेट ! मर्सिडीझ बेंन्ज कंपनीने घेतला ‘हा’ निर्णय, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
- लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 1500 रुपये, सप्टेंबरच्या हप्त्याची तारीख जाहीर
- तुमच्या गावातील ग्रामपंचायत व्यवस्थित काम करत नाही का ? मग ‘या’ ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकाची तक्रार करा
- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी ! ‘हा’ नियम पाळला नाही तर विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देता येणार नाही
- राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही