कोल्हार खुर्द – कोल्हार, चिंचोली, आंबी, पिंपळगाव फुनगी येथे श्रीरामपूर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना व महायुतीचे अधिकत उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आल्या.
यावेळी गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकत्यांशीसंवाद साधला. आज या सभांना शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली.

यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. चंद्रशेखर कदम, रावसाहेब साबळे, सुरेश करपे, राहुरी कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव निमसे, रावसाहेब खेवरे, दत्ता पाटील, दीपक पाटील, पोपटराव लाटे आदी उपस्थित होते.
खा. लोखंडे – कांबळे सासूरवाडीला एकत्र खा. सदाशिव लोखंडे आणि उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे या दोघांचीही सासूरवाडी कोल्हार खुर्दला असल्याचे समजते.
त्यामुळे लोकसभेला एकमेकाविरोधात लढलेले लोखंडे – कांबळे यांच्या एकत्र येण्याचे पर्व सासूरवाडीपासून सुरू झाल्याचे बोलले जाते. यावेळी बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी, पाटपाण्याच्या प्रश्नासाठी युतीचे सरकार येणार असल्याने कांबळे यांना विजयी केल्यास विकासाला निश्चित गती मिळेल याची ग्वाही मी देतो, असे सांगितले.
- आज पासून फोनपे, गुगलपेच्या नियमात झाला मोठा बदल ! आता ग्राहकांना एका दिवसात….
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…