अहमदनगर : त्यांनी २५ वर्ष नगर शहरात जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करीत दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली.
तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला.

तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला.
त्यामुळे तुम्ही ठरवा शहराला विकासाकडे न्यायचे की पुन्हा पहिले दिवस आणायचे अशा शब्दात मतदारांना साद घालत आ.संग्राम जगताप यांनी विरोधकांवर सडकून टिका केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नगर शहर मतदार संघातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी मुकुंदनगर परिसरात तसेच सर्जेपुरा भागात प्रचारफेरी काढली. तर प्रभाग ६ मध्ये आयोजित संवाद मेळाव्यात नागरिकांशी संवाद साधला.
मुकुंदनगरच्या प्रचार फेरीत नगरसेवक समद खान, बाबा खान, फैय्याज शेख, फारूकभाई शेख, रफिक मुन्शी, सलीम भिंगारवाला यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रभाग ६ मध्ये आयोजित संवाद मेळाव्यास माजी नगरसेवक दगडू पवार, नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, योगेश गलांडे, आकाश दंडवते, अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, डॉ. अविनाश मोरे, संजय सत्रे आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले, नगर शहराच्या विकासाबरोबरच तरुणवर्गाला चांगली दिशा देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण विकासाचे व्हिजन घेऊन नागरिकांसमोर जात आहोत.
शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत सर्व नागरिकांनी कुठल्याही अपप्रचाराला, भुलथापांना बळी न पडता विकासाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…
- IFCI Share Price: IFCI शेअर्समध्ये मागच्या आठवड्यापासून तेजी! दिला 5.82% रिटर्न… आज मात्र?