नगर : जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांचे मनोमिलन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गांधी आणि राठोड यांची आज संयुक्तपणे बैठक झाली.
गांधी, राठोड, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी या बैठकीत मनमोकळी मते मांडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार दिलीप गांधी हे महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारापासून दूर होते.

गांधी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु आज गांधी आणि राठोड यांची भाजप पक्ष कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थित संयुक्त बैठक घेऊन शहरातील राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.
राठोड म्हणाले, ”नगर शहराची पाच वर्षात देशात, महाराष्ट्रात जी प्रतिष्ठा गेली, ती परत मिळवायची आहे. त्यांच्याबरोबर जाणे म्हणजे शहराला बरबाद करण्यासारखे आहे. मध्ये खूप गडबड झाली. नगरकरांना देखील ओरिजनल कोण, हे चांगले माहित झाले आहे.”
भाजप-शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. 35 वर्षांपासून भगवा झेंडा हातात घेतला आहे. तो खाली ठेवलेला नाही. छोटा-मोठा असण्यापेक्षा, तो भाऊ असणे गरजेचा आहे. आतापर्यंत भाजप-शिवसेनेच्या जोरावरच निवडून आलो आहे, असेही राठोड यांनी म्हटले.
गांधी म्हणाले, ”पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाल्याची घटना देशात कोठेही झालेली नाही. हा प्रकार लाजिरवाणा आहे. बिहार झाला का, असे वाटते. हे धक्कादायक आहे. असे असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एकही दंगल झाली नाही.”
थोडा उशिरा झाला आहे. परंतु योग्य वेळी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्रित आलो, त्याच दिवशी विजय निश्चित झाला. शहरातील यापुढे होणार्या प्रचारात आपण उतरणार असल्याचे गांधी यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगांवकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, भाजपचे शहर उपाध्यक्ष किशोर डागवाले, गणेश कवडे, विक्रम राठोड, सुवेंद्र गांधी, वसंत राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
- RPOWER Share Price: बापरे! 5 वर्षात दिला 1479.33% रिटर्न… तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?
- Tata Steel Share Price: लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी टाटाचा ‘हा’ शेअर उत्तम? 5 वर्षात दिलाय 333.1% परतावा
- MAHABANK Share Price: ‘या’ सरकारी बँकेच्या शेअरच्या किमती वधारल्या…BUY करावा का? बघा तज्ञांचा सल्ला
- फडणवीस सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करणार का ? कृषिमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार मोठी वाढ