बारामती :- महाराष्ट्राच्या राजकारणातील आश्वासक युवा चेहरा म्हणून रोहित पवार ओळखले जातात. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू म्हणून त्यांची विशेष ओळख. बारामती हा आपला बालेकिल्ला सोडून रोहित थेट कर्जत-जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
गेली पाच-सहा महिने रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे आपली लाडकी मुलगी आनंदीता आणि मुलगा शिवांश यांना त्यांना वेळ देता आला नाही. निवडणुकीच्या धामधुमीत अडकलेल्या डॅडावर आनंदीताने अनेक प्रश्नांची सरबत्ती केली.

लाडक्या लेकीच्या प्रश्नांची उत्तरं दिल्यावर निकालाआधी मिळालेला वेळ हा पूर्णपणे कुटुंबीयांसोबत घालवणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. तर निवडणूक आयोगाने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्याची संधी दिल्याचं सांगत अजित दादांसोबत सभागृहात बसण्याचा आनंद वेगळाच असेल, असेही रोहित पवार म्हणाले.
एकीकडं रोहित पवार गेली पाच महिने निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना त्यांच्या पत्नी कुंती यांनी घर, कुटुंब आणि निवडणूक प्रचार या तिन्ही आघाड्या यशस्वी सांभाळल्या. मुलांना सांभाळत प्रचारासाठी बाहेर पडताना लोक ज्या आनंदाने स्वागत करत होते, ते पाहता आपल्या पतीचा विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
- लाडक्या बहिणींसाठी CM फडणवीस यांची मोठी घोषणा ! योजनेचा ऑक्टोबर हप्ता कधी मिळणार ? वाचा…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळणार ‘हे’ आर्थिक लाभ
- वाईट काळ संपणार ! आता ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार
- गुंतवणूकदार होणार मालामाल ! 3 दिवसात 27% रिटर्न, स्टॉक स्प्लिटची मोठी घोषणा
- मुंबई – पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! MSRDC ने घेतला मोठा निर्णय













