अहमदनगर :- भारत – पाक सिमेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आलं आहे.
कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती.

लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती.
जवान वाल्टे त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत.
वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण दहीगावमध्ये झाले होते. त्यानंतर कोपरगावमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले.
मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.
- पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्च २०२६ मध्ये धावणार, प्रवास होणार सुसाट
- राज्य सरकारचा मोठा निर्णय: राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये व सर्व शासकीय कार्यालयांना भरपगारी सुट्टी; जाणून घ्या कारण
- रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम; बोर्डिंग स्टेशनवरून प्रवास बंधनकारक, अन्यथा सीट जाईल वेटिंग प्रवाशाला
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी): शहरातील घराच्या स्वप्नाला सरकारचा मजबूत आधार
- १८ फेब्रुवारीपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई; परिवहन विभाग अॅक्शन मोडमध्ये













