बारामती –
राष्ट्रवादी काँग्रेससोबत गुप्तपणे हातमिळवणी करून अजित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याच्या रागातून बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बसपचे उमेदवार अशोक माने यांची मारहाण करत बारामतीत धिंड काढली.
बारामतीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आमराई भागातून सर्वांगाला काळे फासून अर्धनग्न धिंड काढून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनाही शिव्यांची लाखोली वाहत मारहाण केली.

काही अंतर धिंड काढल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या तावडीतून त्यांची सुटका केली. माने हे बारामतीमधून बसपचे उमेदवार होते. मतदान तारखेच्या आधी ७ दिवस मोबाइल फोन बंद करून ते अज्ञातवासात होते.
सोमवारी मतदान झाल्यानंतर ते घरी असल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी त्यांना मारझोड करण्यास सुरुवात केली. नंतर अर्धनग्न करून अंगाला काळे फासून त्यांची धिंड काढली.













