अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार डाॅ. किरण लहामटे सध्या सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानत ते सत्कार स्वीकारत आहेत.
बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीला ते वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

डाॅ. लहामटे दुपारनंतर मुंबईला रवाना झाले. ते सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले, पण तोपर्यंत नेता निवड झाली होती.
स्वतः अजित पवार यांनी आपल्या भाषणात लहामटेंचा नामोल्लेख केल्यामुळे माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांची ४० वर्षांची एकहाती सत्ता उलथवून
विक्रमी मतांनी विजयी झालेले हे डाॅ. लहामटे कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या आमदारांना व कार्यकर्त्यांना होती.
मात्र, ही संधी डाॅ. लहामटे यांनी गमावली. नंतर डाॅ. लहामटे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यास डॉ. लहामटे यांना वेळ मिळालेला नाही.
शेतकरी पुरते हवालदिल झाले असताना नवे आमदार त्यांच्या मदतीला कधी धावून येणार आहेत, अशी विचारणा केली जात आहे.
- शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी भेट! राज्य मंत्रिमंडळाने घेतलेत ८ मोठे निर्णय
- साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी एसटी महामंडळाची नवी योजना ! 27 सप्टेंबर पासून सुरु होणार विशेष बससेवा, तिकीट किती असेल?
- महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्गासाठी आणखी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर !
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाची अखेरची डेडलाईन ! ‘या’ तारखेपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश
- Reliance Power Share Price: रिलायन्स पॉवर शेअर करणार धमाल! एका दिवसात 3.51% रिटर्न…आज मिळेल प्रॉफिट?